November 3, 2025 7:14 PM

views 32

हॉकीच्या शतकपूर्तीनिमित्त देशभरातल्या जिल्ह्यांमध्ये हॉकी स्पर्धांचं आयोजन

हॉकीची १०० वर्षं साजरी करण्यासाठी येत्या ७ नोव्हेंबर रोजी देशभरातल्या साडेपाचशेहून अधिक जिल्ह्यांमध्ये १ हजार ४०० हून अधिक हॉकी स्पर्धा आयोजित केल्या जातील, अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. या उपक्रमाचा उद्देश खेळाबद्दल व्यापक जागरुकता निर्माण करणं, तरुणांना हा खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करणं तसंच देशाची क्रीडा संस्कृती बळकट करणं हा आहे. यामुळे तरुणांना हॉकीचा इतिहास जाणून घेऊन त्यांचं भविष्य घडवण्यासाठी प्रेरणा मिळेल...

September 7, 2024 7:56 PM

views 51

देशातले खेळाडू, प्रशिक्षकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात केंद्र सरकार कटीबद्ध – क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय

देशातले खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक यांना आवश्यक त्या सर्व  सुविधा उपलब्ध करून देण्यात केंद्र सरकार कटीबद्ध असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत पॅरीस पॅरालिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंचा सन्मान केल्यानंतर बोलत होते. या सुविधांमुळे खेळाडूंना अधिक चांगलं  प्रशिक्षण मिळायला मदत होईल, असं ते म्हणाले. सरकार खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा  सुविधा विकसित करत आहे, या सुविधांमुळे हे खेळाडू सर्व प्रकारच्या सामन्यांत उत्तम कामगिरी करू शकणार असल्याचं त्...