दक्षिण कोरियात जंगलात लागलेल्या आगीमुळे अंतर्गत मंत्रालय भागात आपत्ती घोषित

दक्षिण कोरियात  जंगलात लागलेल्या आगीमुळे अंतर्गत मंत्रालयानं या भागात  आपत्ती घोषित केली आहे. ही आग देशाच्या आग्नेय भागातल्या जंगलांना लागली आहे. या आगीत कमीत कमी ४ जणांचा मृत्यू झाला असून प्रचंड नुकसान झालं आहे. उत्तर आणि दक्षिण ग्योंगसांग प्रांतात तसंच  आग्नेयेला उल्सान शहराला आग  लागली आहे. 

 

आगीमुळे उल्सान आणि बुसानच्या दरम्यान असलेल्या  प्रमुख वाहतूक मार्गाबरोबर आग्नेयकडचे महामार्ग  बंद करण्यात आले आहेत. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दल आणि शेकडो अधिकारी मदत कार्यात सहभागी झाले आहेत.