दक्षिण कोरियातला विमान अपघात पक्ष्यामुळे झाल्याची माहिती

दक्षिण कोरियातला विमान अपघात पक्ष्यामुळे झाल्याची माहिती मिळत आहे. अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी विमानाला पक्ष्याची धडक बसू शकते, असा इशारा विमान नियंत्रकांनी दिला होता, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. अपघातातून वाचलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एकानेही पक्ष्याची धडक बसल्याचा उल्लेख केला होता. मात्र, तरीही या अपघातामागच्या मूळ कारणाचा शोध अधिकारी घेत आहेत. या अपघातात आतापर्यंत १७९ जणांचा मृत्यू झाला आहे. यात १७५ प्रवासी आणि ४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.