डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सोलापूर कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या निवडणूका जाहीर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध प्रवर्गातल्या संचालकांच्या १८ पदांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता येत्या १३ ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशपत्रं स्वीकारली जाणार आहेत.

१४ ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाणार असून त्यानंतर २९ ऑक्टोबरला ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे. मतदान१० नोव्हेंबरला होणार असून ११ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.