डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात यंदाच्या खरीप हंगामात आत्तापर्यंत 23 टक्के पेरण्या पूर्ण

राज्यात यंदाच्या खरीप हंगामात आत्तापर्यंत 23 टक्के म्हणजे 33 लाख 59 हजार 81 हेक्टर जमिनीवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत 19 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. राज्यात सर्वांत कमी पेरण्या कोकण विभागात आणि सर्वाधिक पेरण्या पुणे विभागात झाल्या आहेत. सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. सोयाबीनचं राज्यातलं सरासरी क्षेत्र 47 लाख 21 हजार 488 हेक्टर आहे. त्यापैकी 11 लाख 54 हजार 461 हेक्टरवर म्हणजे 24 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.

 

कपाशीची 27 टक्के क्षेत्रावरची पेरणी पूर्ण झाली आहे. मका या पिकाखालील क्षेत्रातही अलीकडे वाढ होत आहे. मे महिन्यात झालेल्या पावसामुळे; विशेषतः कमी पावसाच्या भागात घेतल्या जाणार्याा बाजरीच्या पेरण्यांना फायदा झाल्याचं दिसून येत आहे. जमिनीला वाफसा आला तर राज्याच्या पश्चिम आणि उत्तरेकडील जिल्ह्यांतील पेरणी क्षेत्रातही चांगली वाढ होईल, असं पुणे कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी सांगितलं आहे.