November 11, 2025 8:34 PM | Sindhudurg

printer

सिंधुदुर्गात मुलगी जन्माला येताच आधार कार्डासह विविध प्रमाणपत्र देऊन स्वागत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलगी जन्माला येताच आधार कार्डासह विविध प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्याचा उपक्रम महिला आणि बालकल्याण विभागानं हाती घेतला आहे.

 

(जन्माला येणाऱ्या मुलींच स्वागत करताना त्या मुलींचं आधार कार्ड, आभाकार्ड, वय  अधिवास आणि राष्ट्रीयत्वाच प्रमाणपत्र तसंच जात प्रमाणपत्र सुद्धा देण्याची संकल्पना जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये तहसीलदारांमार्फत प्रत्येकी १० ते १५ मुलींच वेगवेगळी प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  अशा प्रकारे १०० मुलींना जन्मताच ही प्रमाणपत्र देऊन त्यांच स्वागत करण्याचा पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे.)