October 15, 2025 7:46 PM | Sindhudurg

printer

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विकासकामांना मंजुरी

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्यातल्या विकासकामांना मंजुरी दिली असून निधी वितरण करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला २०२५-२६ साठी २८२ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. यातील तीस टक्के म्हणजे ८४ कोटी ६० लाख रुपये जिल्हा नियोजन समितीला प्राप्त झाले आहेत. या निधीपैकी ५८ कोटी २६ लाख रुपये विविध विकासकामांसाठी वितरित झाल्याचं प्रशासनानं सांगितलं. निधी वेळेवर वितरीत केला जावा तसंच गुणवत्तापूर्ण काम करावं असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत.