पुणे जिल्ह्यात मावळ इथं पूल दुर्घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या साकवांची तातडीनं तपासणी केली. त्यामध्ये ८१३ साकवांपैकी केवळ १६९ साकव सुस्थित असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली.
मावळ पूर दुर्घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी तात़ीनं साकवांच्या तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार केलेल्या तपासणीत ४०६ साकवांची दुरुस्ती करणं आवश्यक असून त्यासाठी ३३ कोटी १४ लाख रुपयांच्या निधीची तर ३१३ ठिकाणी नवीन साकव बांधण्याची आवश्यकता असून त्यासाठी ९७ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याची माहिती खेबुडकर यांनी दिली.