गेल्या ११ वर्षांमध्ये भांडवली खर्चात लक्षणीय वाढ

भांडवली खर्चात गेल्या अकरा वर्षांमध्ये लक्षणीय वाढ होऊन तो २०२४-२५ मध्ये ११ लाख कोटींवर पोचला असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी  म्हटलं आहे. रालोआ सरकारने अकरा वर्ष पूर्ण केल्याबद्द्ल लिहिलेल्या लेखात वैष्णव यांनी गेल्या दशकभरात प्रत्यक्ष पायाभूत सुविधांमध्ये वेगाने वाढ झाल्यांचं म्हटलं आहे. एकूण ५९ हजार किलोमीटर रस्ते आणि ३७ हजार ५०० किलोमीटर रेल्वे मार्गांचं काम या काळात झाल्याचं त्यांनी या लेखात नमूद केलं आहे.  

 

हर घर जल या योजने मार्फत १ कोटी ४० लाख घरांपर्यंत नळाचे पाणी पोचले आहे तर आयुष्मान भारतमुळे ३ कोटी ५० लाख व्यक्ती आरोग्यविम्याच्या छत्राखाली आल्याचं त्यांनी या लेखात नमूद केलं आहे. 

 

याशिवाय गेल्या दहा वर्षामध्ये  ५३ कोटींहून जास्त जनधन खाली उघडली गेली आहेत. ४० दशलक्ष घरं आणि १२० दशलक्ष शौचालयं बांधली गेली  तर १० कोटी कुटुंबांमध्ये लाकडांऐवजी स्वयंपाकाच्या गॅसचा वापर होऊ लागला आहे असंही वैष्णव यांनी या लेखात नमूद केलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.