डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर दावा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विधानसभेतल्या विरोधी पक्ष नेते पदावर दावा सांगितला आहे. आमदार भास्कर जाधव यांची नेमणूक करावी असं पत्र पक्षानं आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलं. अर्थसंकल्पापूर्वी भास्कर जाधव यांची विरोधी पक्षनेते पदी नेमणूक होईल, अशी आशा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते पद महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांसोबत अडीच-अडीच वर्षांसाठी वाटून देण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा