डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 7, 2024 6:14 PM | Assembly Election

printer

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा प्रसिद्ध

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज मुंबई इथून आपला वचननामा प्रसिद्ध केला. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी या वचननाम्याचं प्रकाशन झालं. संस्कार, अन्नसुरक्षा, महिला, आरोग्य, शिक्षण, पेन्शन, शेतकरी, वंचित समूह, उद्योग तसंच मुंबईच्या विकासासाठी असलेलं धोरण या प्रमुख घटकावर आधारीत हा वचननामा आहे. हा आपल्या पक्षाचा वचननामा असून महाविकास आघाडीचा सविस्तर जाहीरनामा लवकरच जाहीर होईल, असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. यावेळी ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, आमदार अनिल परब यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

 

त्यानंतर आज दुपारी उद्धव ठाकरे यांनी अमरावती जिल्ह्यातले महाविकास आघाडीचे उमेदवार गजानन लवटे यांच्यासाठी दर्यापूर इथे प्रचारसभा घेतली. निवडणुका आल्यावर या सरकारनं शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी योजना जाहीर केल्या. मग अडीच वर्षे काय केलं असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी या प्रचारसभेत महायुती सरकावर टीका केली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.