डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यात आणि देशात महिला सुरक्षित नसून भ्रष्टाचार वाढला आहे – शरद पवार

राज्यात आणि देशात महिला सुरक्षित नसून भ्रष्टाचार वाढला आहे, देशात सध्या मोदी यांची हुकूमशाही सुरू आहे अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. ते आज परभणी जिल्ह्यात सेलू इथं प्रचारसभेत बोलत होते. महविकास आघाडीचं सरकार आल्यावर महिलांना दरमहा तीन हजार रुपये, बसचा मोफत प्रवास, जातनिहाय जनगणना करून ५०टक्के आरक्षणाची मर्यादा काढून आरक्षण, कृषी समृध्दी योजनेत ३ लाखांपर्यंत कर्ज माफी, बेरोजगार तरुणांना ४ हजार रुपये मदत हे निर्णय घेणार असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं.