केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज उत्तराखंडमध्ये रुद्रपूर इथं उत्तराखंड सरकारच्या १ हजार २७१ कोटी रुपये किमतीच्या विविध विकास कामांचं उदघाटन आणि पायाभरणी केली. रुद्रपूर इथं आयोजित ‘उत्तराखंड गुंतवणूक महोत्सव २०२५’ मध्ये त्यांनी देशभरातले गुंतवणूकदार आणि उद्योजकांशी संवाद साधला. उत्तराखंड सारख्या छोट्या राज्यांच्या प्रगतीशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही, म्हणूनच केंद्रसरकार लहान राज्य आणि पूर्वेकडच्या राज्यांच्या विकासाकडे विशेष लक्ष देत असल्याचं ते यावेळी म्हणाले.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी औद्योगिक विकास आणि पर्यावरणामध्ये समतोल साधला असून, पारदर्शक धोरणं, गतिशील अंमलबजावणी आणि दूरदृष्टीने उत्तराखंडच्या सर्वांगीण विकासाची रूपरेषा आखल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तराखंडमधल्या आजच्या १ लाख कोटी रुपये गुंतवणुकीतून, ८१ हजाराहून अधिक रोजगार निर्माण झाल्याचं ते म्हणाले.