सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनामार्फत ‘शाळा तिथे दाखला’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना लागणाऱ्या दाखल्यांसाठी महसूल विभाग शाळेतून अर्ज भरुन घेतल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करुन दोन ते चार दिवसात दाखले वितरीत करेल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त सिंधुदुर्गाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पडतेवाडी इथल्या शाळेला भेट दिली.