डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाने आपली २२ उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. यात माळशिरसमधून उत्तम जानकर, फलटण इथून दीपक चव्हाण, खडकवासला इथून सचिन दोडके, अकोले इथून अमित भांगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीड इथून संदीप क्षीरसागर, गंगापूरमधून सतीश चव्हाण, येवला इथून माणिकराव शिंदे, दिंडोरी इतून सुनीता चारोसकर यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे.  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबई इथं वार्ताहर परिषदेत या नावांची घोषणा केली. 

काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. २३ उमेदवारांच्या यादीत काँग्रेसनं राळेगाव इथून माजी मंत्री वसंत पुरके, सावनेरमधून अनुजा केदार, अर्जुनी-मोरगाव इथून दिलीप बनसोड, जालन्यातून कैलास गोरंट्याल आणि शीव-कोळीवाडा मतदारसंघातून गणेश यादव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं धुळ्यातून अनिल गोटे, हिंगोलीतून रूपाली पाटील, शिवडीतून अजय चौधरी तर भायखळ्यातून मनोज जामसुतकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तसंच वर्सोवा इथून हरून खान, घाटकोपर पश्चिम इथून संजय भालेराव आणि विलेपार्ले इथून संदीप नाईक या तीन नावांची घोषणाही पक्षाने केली आहे.