October 26, 2024 7:30 PM

views 48

महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाने आपली २२ उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. यात माळशिरसमधून उत्तम जानकर, फलटण इथून दीपक चव्हाण, खडकवासला इथून सचिन दोडके, अकोले इथून अमित भांगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीड इथून संदीप क्षीरसागर, गंगापूरमधून सतीश चव्हाण, येवला इथून माणिकराव शिंदे, दिंडोरी इतून सुनीता चारोसकर यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे.  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबई इथं वार्ताहर परिषदेत या नावांची घोषणा केली.  काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासा...