आचारसंहिता लागू झाल्यापासून सी व्हिजिल ऍपवर ५७६ तक्रारी

राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सी व्हिजिल या ऍपवर आतापर्यंत ५७६ तक्रारी आल्या असून त्यातल्या ५६३ तक्रारी निकाली काढण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी दिली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय, सार्वजनिक, खासगी जागेतल्या विनापरवानगी लावलेल्या जवळपास सात लाख जाहिराती काढल्या, तसंच बेकायदेशीर पैसे, दारू, अमली पदार्थ इत्यादी मिळून १४ कोटी ९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.