October 26, 2024 6:28 PM

views 41

सी व्हिजिल ऍपवर आचारसंहिता उल्लंघनाच्या बाराशे ५९  तक्रारी दाखल

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून कालपर्यंत सी व्हिजिल ऍपवर आचारसंहिता उल्लंघनाच्या बाराशे ५९  तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील बाराशे ५०  तक्रारी निकाली काढल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. दरम्यान, राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी केलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू इत्यादी स्वरुपात १०० कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून राज्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचं मुख्य निवडण...

October 20, 2024 3:48 PM

views 23

आचारसंहिता लागू झाल्यापासून सी व्हिजिल ऍपवर ५७६ तक्रारी

राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सी व्हिजिल या ऍपवर आतापर्यंत ५७६ तक्रारी आल्या असून त्यातल्या ५६३ तक्रारी निकाली काढण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी दिली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय, सार्वजनिक, खासगी जागेतल्या विनापरवानगी लावलेल्या जवळपास सात लाख जाहिराती काढल्या, तसंच बेकायदेशीर पैसे, दारू, अमली पदार्थ इत्यादी मिळून १४ कोटी ९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं.