डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

वाल्मिक कराडवर ईडीनं कारवाई का केली नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल

बीड जिल्ह्यातल्या सरपंच हत्याप्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडवर ईडीनं कारवाई का केली नाही, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्या आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होत्या. कराडला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं यापूर्वीच नोटीस दिली होती. मात्र कुठलीही कारवाई झाली नाही. ती झाली असती तर सरपंच हत्याप्रकरण घडलंच नसतं, अस त्या म्हणाल्या. 

पीएमएलए कायद्याअंतर्गत कराडला नोटीस आली तरी कारवाई होत नाही. अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक यांना एक कायदा आणि वाल्मिक कराडला वेगळा कायदा का ? असा प्रश्न सुळे यांनी केला. या प्रकरणात आपण आणि खासदार बजरंग सोनावणे अर्थमंत्र्यांना ईडी कारवाईबाबतही पत्र लिहिणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.