डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं ठिकठिकाणी उत्साहात स्वागत

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं काल सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. “माऊली माऊली” च्या गजरात पालखीचं जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आलं. यावेळी दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यापूर्वी माऊलींच्या पादुकांना निरा नदी पात्रात पारंपरिक पद्धतीने स्नान घालण्यात आलं. पालखी आज लोणंदचा मुक्लाम आटोपून पुढे मार्गस्थ होणार आहे. संत श्री गजानन महाराजांची पालखी काल धाराशिव शहरात पोहोचली. पालखीच्या स्वागतासाठी शहरात भाविकांनी रस्त्यावर फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. ही पालखी आज तुळजापूर मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

 

अंबाजोगाई शहरात हिंगोली जिल्ह्यातील नरसीचे संत नामदेव यांची पालखी, अंबाजोगाईतील महसूल विभागाची पालखी, संत मोहनानंद महाराज यांची पालखी, चारोधाम हनुमान पायी पालखी या चार पालख्यांचा एकत्रिरित्या रिंगण सोहळा काल उत्साहात पार पडला. अश्वरिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. वारकऱ्यांचे विविध मैदानी खेळ, महिलांच्या फुगड्या, बाल वारकऱ्यांची झालेली दिंडी स्पर्धा हे या सोहळ्याचे खास आकर्षण ठरलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा