विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीत रिपब्लिकन पक्षाची ८ ते १० जागांची मागणी

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाच्या चर्चा अजून सुरू असून रिपब्लिकन पक्षाला ८ ते १० जागांची मागणी करणार आहोत, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नागपूर इथे वार्ताहर परिषदेत दिली. या सर्व जागा रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावरच लढू असंही त्यांनी स्पष्ट केलं. यामध्ये उत्तर नागपूर आणि यवतमाळमधली उमरखेड विधानसभा मतदारसंघाची जागा मागणार असल्याची माहितीही आठवले यांनी दिली.