डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

त्रिभाषा सूत्रासंदर्भात डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची घोषणा

शालेय शिक्षणात तिसरी भाषा कधीपासून शिकवावी, ती कोणती असावी, कशी शिकवली जावी, यासंदर्भात शिफारशी करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. यासंदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याचंही फडणवीस यांनी जाहीर केलं. विरोधकांनी या चहापानावर बहिष्कार टाकला आणि सरकारला एक पत्रही दिलं. मात्र विरोधकांकडे कोणतेही नवे मुद्दे, कल्पकता, लोकाभिमुखता नाही, अशी टीका त्यांनी केली. सत्तेत असताना एक आणि सत्तेबाहेर असताना एक, असं विरोधकांचं धोरण असल्याचा आणि केवळ विरोधाला विरोध होत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसंच इतर नेते यावेळी उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा