डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विक्रमी 64 पूर्णांक 66 टक्के मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान काल पार पडलं. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत, विक्रमी 64 पूर्णांक 66 टक्के मतदानाची नोंद झाली. या टप्प्यात एकंदर 1 हजार 3 शे 14 उमेदवारांचं राजकीय भवितव्य ई व्ही एम मशीन मध्ये सीलबंद झालं आहे. या टप्प्यात, एकंदर 1 हजार 3 शे 14 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, यात, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा, नितीश कुमार मंत्रिमंडळातील 16 मंत्री आणि महाआघाडीबंधनाचे उमेदवार आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांचा समावेश आहे.

 

काही तुरळक घटना वगळता, मतदान शांततेत पार पडलं. लखीसराय जिल्ह्यात जमावानं उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे उमेदवार विजयकुमार सिन्हा यांच्या ताफ्यावर, मतदान केंद्राजवळ हल्ला केला. या घटनेशी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं पोलिस दलाल दिले आहेत.

 

निवडणूक आयोगाच्या आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रमांतर्गत सहा देशांतील प्रतिनिधींनी काल पाटणा, मुझफ्फरपूर, वैशाली आणि नालंदा या मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान प्रक्रियेचं निरीक्षण केलं. मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी, निवडणूक आयोग करत असलेल्या उपाययोजनांची या प्रतिनिधींनी प्रशंसा केली.