महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाही – काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला

महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसून तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढणार आहेत, येत्या दोन दिवसांत जागावाटपाची चर्चा पूर्ण होईल, असं काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी हाच आपला चेहरा आहे, एकजुटीने भाजपाशी लढू आणि सरकार स्थापन करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

 

त्याआधी चेन्निथला यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. 

 

मुंबईत टिळक भवन इथं काँग्रेसची बैठक आज झाली. यात प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासह विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतले काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील उपस्थित होते. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.