राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात, झारखंड, ओदिशा आणि मध्य प्रदेशाच्या पश्चिम भागात आज अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे.
दिल्लीचा काही भाग,चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मिर, कर्नाटकचा समुद्रकिनारी भाग, अंदमान-निकोबार द्वीपसमूह आणि पूर्वेकडील राज्यांत पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
मध्य प्रदेशाच्या काही भागात, बिहार, झारखंड, ओदिशा, सिक्कीम, तेलंगणा, उत्तराखंड आणि राजस्थानच्या पश्चिमकेडील भागात आज मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस तसंच वादळी वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर आंध्र प्रदेश, तामिळ नाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं वातावरण उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे.