मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशचा पूर्वेकडचा प्रदेश, आणि ईशान्य भारतात आज अती जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आज मध्यम ते जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे.
पश्चिम बंगालचा डोंगराळ भाग, छत्तीसगड, झारखंड, अंदमान आणि निकोबार द्वीप समूह, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तरप्रदेशच्या पश्चिमेकडचा प्रदेश आणि राजस्थानच्या पूर्वेकडच्या भागातही आज जोरदार पावसाची शक्यता आहे, तर केरळ, लक्षद्वीप, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकचा किनारपट्टी प्रदेश आणि तेलंगणामध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.