May 30, 2025 7:41 PM | Heavy rain

printer

धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस

राज्यात गेल्या २४ तासात धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ४२ पूर्णांक २ दशांश मिलीमीटर पाऊस झाला. बीड जिल्ह्यात २४ मिलीमीटर, तर जालना जिल्ह्यात १३ पूर्णांक ९ दशांश मिलीमीटर इतक्या सरासरी पावसाची नोंद झाली आहे. सध्या  राज्यात परिस्थिती नियंत्रणात असून कुठेही पूर परिस्थिती उद्भवलेली नाही. 

 

धाराशिव जिल्ह्यात वाहतुकीचे मार्ग अतिवृष्टीमुळे बदलण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोली घाटावर दरड कोसळली होती पंरतु आता या मार्गावरची  वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. महाडमधल्या इंडो अमाईन्स या कंपनीमध्ये वायू गळतीमुळे एक कामगार जखमी झाला होता. पंरतु सध्या वायू गळती बंद असून परिस्थिती नियंत्रणात आल्याचं राज्य आपत्कालीन केंद्रानं कळवलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.