डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

वंदे भारत रेल्वे गाड्यांमध्ये पुढील दोन महिन्यात शयनयान कक्षाची चाचणी घेण्यात येणार

वंदे भारत रेल्वे गाड्यांमध्ये पुढील दोन महिन्यात शयनयान कक्षाची चाचणी सुरू होईल, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत दिली. सध्या वंदेभारत मध्ये केवळ बसण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. वंदेभारतमध्ये शयनयानाची मागणी प्रवाशांकडून होत असल्याचं वैष्णव म्हणाले.

गेल्या दहा वर्षात ३५ हजार किलोमीटर रेल्वेमार्गाचं जाळं निर्माण करण्यात आलं असून कमी उत्पन्न गटाच्या प्रवाशांनाही आरामदायी प्रवास-सोयी उपलब्ध करुन देण्याकडे आपण लक्ष देत असल्याचं त्यांनी सांगितलं. अमृत भारत रेल्वेच्या उत्पादनवाढीचं काम वेगात सुरु असल्याची माहितीही वैष्णव यांनी यावेळी दिली.