महाराष्ट्रात रेल्वे प्रकल्पांमध्ये १ लाख ६४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

महाराष्ट्रात रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांमध्ये १ लाख ६४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली. राज्यात रेल्वेला प्रत्येक स्थानकावर थांबा देण्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. पुण्याहून रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण तसंच तिहेरीकरणाचं काम सुरु असून, रेल्वेचं जाळं मोठ्या प्रमाणात विस्तारणार येणार आहे. त्यानंतर रेल्वे थांबे वाढवण्यात येणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. राज्यात रेल्वेशी संबंधित कामं योग्य रितीने सुरु असल्याचं सुळे यांनी नमूद केलं.