रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सौदी अरेबियाचे परिवहन मंत्री सलेह अल जास्सर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. रस्ते आणि रेल्वे वाहतूक क्षेत्रातल्या सहकार्याबद्दल उभयपक्षी हिताच्या मुद्द्यांवर त्यांनी विचारविमर्श केला. रशियात सेंट पीटर्सबर्ग इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेसाठी सध्या अश्विनी वैष्णव रशियाच्या दौऱ्यावर आहेत. वैष्णव यांनी काल रशियाचे उपप्रधानमंत्री एलेक्सी ओवरचुक यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. यावेळी भारत आणि रशिया दरम्यान मुख्यतः परिवहन, संपर्क यंत्रणा, पायाभूत सुविधा आणि दुर्मिळ धातू या क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा झाली.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सौदी अरेबियाच्या परिवहन मंत्र्यांशी केली द्विपक्षीय चर्चा
