डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

April 28, 2025 2:55 PM | Rafale Marine

printer

राफेल मरीन प्रकारच्या २६ लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी आज भारताचा फ्रान्सबरोबर संरक्षण करार

केंद्र सरकार राफेल मरीन प्रकारच्या २६ लढाऊ विमानांची खरेदी करणार असून त्यासाठी आज फ्रान्सबरोबर संरक्षण करार होणार आहे. संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी आणि भारतातले फ्रेंच राजदूत यांच्या उपस्थितीत संरक्षण करारावर स्वाक्षऱ्या होतील.

 

भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह हे भारताचं प्रतिनिधित्व करतील. या २६ विमानांपैकी २२ सिंगल सीटर प्रकारची तर उर्वरित ४ डबल सीटर प्रकाराची विमानं आहेत. भारतीय नौदलाच्या गरजेनुसार या विमानांची रचना असेल. ही विमानं भारतीय नौदलाच्या विक्रांत आणि विक्रमादित्य या युद्धनौकांवर तैनात केली जातील.