डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मुंबईत सृजनशील आणि सांस्कृतिक रेडिओ महोत्सवाचं आयोजन

जागतिक संगीत दिनानिमित्त येत्या २१ जून रोजी देशातला पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक रेडिओ महोत्सव तसंच महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार सोहळा मुंबईत होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी वार्ताहर परिषदेत आज दिली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस उपस्थित राहणार आहेत.

 

राज्याची सांस्कृतिक, ऐतिहासिक परंपरा जपण्याचं काम रेडिओनं केलं असून देशाच्या स्वातंत्र्यापासून ते महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंत सर्व ऐतिहासिक घटनांचा रेडिओ साक्षीदार आहे, असं शेलार यावेळी म्हणाले. रेडिओच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं शेलार यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.