September 2, 2024 9:26 AM | West Bengal

printer

पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी आंदोलन सुरू

 

पश्चिम बंगालमध्ये आर. जी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या निवासी डॉक्टरवरील नृशंस अत्याचाराविरोधात आणि न्यायासाठी निदर्शनं अजूनही सुरू आहेत. कालही राज्यात अनेक ठिकाणी रॅली काढण्यात आल्या.

 

सामान्य नागरिकांनी काढलेल्या रॅलीत कलाकार, डॉक्टर्स, विद्यार्थी आणि सामान्य नागरीक रस्त्यावर उतरले. तर नागरी समाजाचे प्रतिनिधी रात्रभर धरमतला इथं धरणं आंदोलन करत आहेत. रामकृष्ण मिशनचे माजी विद्यार्थीही काल रस्त्यावर उतरले. दरम्यान, कार रुग्णालयाच्या कनिष्ठ डॉक्टर्सनी कोलकातातल्या आणखी सहा ठिकाणी अभया क्लिनिक सुरु केली आहेत.