वाराणसीमध्ये 6 हजार 700 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वाराणसी या आपल्या संसदीय मतदारसंघात 6 हजार 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची काल पायाभरणी आणि उद्घाटन केले. शिक्षण, कौशल्य विकास, क्रीडा, आरोग्यसेवा आणि पर्यटन यासह इतर क्षेत्रांशी संबंधित या विकास प्रकल्पांमुळं वाराणसीतल्या लोकांचं जीवनमान सुधारेल तसंच तरुणांसाठी रोजगाराच्या संधीही निर्माण होतील असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.सारनाथमधील बौद्ध धर्माशी संबंधित क्षेत्राच्या पर्यटन विकास कामांचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांनी केले.बाणासूर मंदिर आणि गुरुधाम मंदिरात पर्यटन विकास कामं आणि उद्यानांचं सुशोभीकरण आणि पुनर्विकास यासारखे अनेक उपक्रमही त्यांनी सुरू केले.