January 3, 2025 3:18 PM

views 25

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आसाममधील विविध विकास प्रकल्पांच उद्घाटन

आसाममधील विविध विकास प्रकल्पांच उद्घाटन आज गुवाहाटी इथं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झालं. कोकराझार आकाशवाणी केंद्राच्या १० किलोवॅट प्रक्षेपकाचं आणि राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेच उद्घाटनही मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं गुवाहाटी इथून झालं.  

November 13, 2024 1:50 PM

views 20

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बिहारमधल्या विकासप्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बिहारमधल्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे. यामध्ये दरभंगा इथं उभारण्यात येणाऱ्या एम्स संस्थेच्या पायाभरणी समारंभाचा समावेश आहे. या एम्स संस्थेत सुसज्ज आधुनिक रुग्णालयासह आयुष विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, परिचारिका महाविद्यालय आणि निवासी सुविधा असतील. मिथिलांचल भागातल्या नागरिकांचं हे गेल्या अनेक वर्षांपासूनचं स्वप्न असून पुढच्या तीन वर्षांत ते पूर्ण होईल असं आमच्या वार्ताहरानं म्हटलं आहे. याबरोबरच विविध राष्ट्रीय महामार्ग आणि रे...

October 21, 2024 10:54 AM

views 52

वाराणसीमध्ये 6 हजार 700 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वाराणसी या आपल्या संसदीय मतदारसंघात 6 हजार 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची काल पायाभरणी आणि उद्घाटन केले. शिक्षण, कौशल्य विकास, क्रीडा, आरोग्यसेवा आणि पर्यटन यासह इतर क्षेत्रांशी संबंधित या विकास प्रकल्पांमुळं वाराणसीतल्या लोकांचं जीवनमान सुधारेल तसंच तरुणांसाठी रोजगाराच्या संधीही निर्माण होतील असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.सारनाथमधील बौद्ध धर्माशी संबंधित क्षेत्राच्या पर्यटन विकास कामांचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांनी क...