प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाराणशी दौऱ्यात आज चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. मोदी यांचं काल संध्याकाळी त्यांच्या संसदीय मतदारसंघात भव्य स्वागत करण्यात आलं.
नवीन वंदे भारत गाड्या बनारस-खजुराहो, लखनऊ-सहारनपूर, फोरिझपूर-दिल्ली आणि एर्नाकुलम-बंगळुरू या मार्गांवरून धावणार आहेत. या गाड्यांमुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचेल तसंच तिथल्या पर्यटनाला चालना मिळणार आहे.