डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये शानदार स्वागत

भारत हा जगभरातील तिसऱ्या क्रमांकाचा स्टार्टअप हब असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोर्ट ऑफ स्पेन इथं काढले. त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय समुदायाला संबोधित करताना ते बोलत होते. तत्पुर्वी विमानतळावर त्यांचे शानदार स्वागत करण्यात आलं. त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय समुदायाचा प्रवास धैर्याचा असून आपले पुर्वज भारतीय संस्कृतीचे वाहक आहेत असंही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच त्रिनिदाद आणि टोबॅगो दौरा आहे आणि 1999 नंतरचा भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा आहे. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात, पंतप्रधान मोदी अध्यक्षा क्रिस्टीन कार्ला कांगालू आणि पंतप्रधान कमला प्रसाद-बिसेसर यांच्याशी चर्चा करतील तसंच ते त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या संसदेच्या संयुक्त सभेला संबोधित करतील. तत्पुर्वी काल पंतप्रधानांनी घानाची राजधानी अक्रा इथं घाना संसदेला संबोधित केलं. भारत ही लोकशाहीची जननी असून विविधता ही या रचनेची ताकद असल्याचं यावेळी बोलताना ते म्हणाले.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा