प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्युनोस आयर्स इथं अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष हॅविअर मिले यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. त्यात व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्य आणि औषधनिर्माण, संरक्षण आणि सुरक्षा, खाणकाम आणि खनिज संपत्ती यासारख्या मुद्द्यांवर सहकार्य कराराची अपेक्षा आहे. अर्जेंटिनाच्या भेटीनंतर, ते रिओ दि जानेरो इथं होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझील इथं रवाना होतील. त्यानंतर आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात ते नामिबिया इथं भेट देतील.