प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडमध्ये १४ हजार २६० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. नवा रायपूर अटलनगर इथं छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. हरित इमारत संकल्पनेवर बांधलेली ही रचना सौरऊर्जेवर चालण्यासाठी तयार केली असून या ठिकाणी पावसाचं पाणी साठवण्याच्या व्यवस्थेचाही समावेश आहे.
माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचं अनावरणही मोदी यांनी केलं.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय तसंच लोकसभेचे सभापती ओम बिरला कार्यक्रमला उपस्थित आहेत.
नवा रायपूर इथं प्रधानमंत्र्यांनी प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेच्या शांतिशिखराचं उद्घाटन केलं. श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयाला भेट दिली तसंच दिल की बात कार्यक्रमाद्वारे सुमारे अडीच हजार बालरुग्णांशी संवाद साधला.