डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दिल्लीत विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिल्लीत विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. जेजे क्लस्टर्समध्ये राहणाऱ्यांसाठी नव्यानं बांधण्यात आलेल्या जवळपास सतराशे सदनिकांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, तसंच राष्ट्रीय राजधानीच्या अशोक विहार भागातील पात्र लाभार्थींना या घरांच्या चाव्याही सुपूर्द केल्या. कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्र्यांनी झोपडीवासियांसाठी बांधलेल्या नव्या सदनिकांची पाहणी केली तसंच स्थानिकांशी संवाद साधला. दिल्ली विद्यापीठाच्या जवळपास सहाशे कोटी रुपये खर्चाच्या तीन प्रकल्पांची पायाभरणी प्रधानमंत्री मोदी यांनी केली तसंच नजफगडच्या रोशनपुरा भागात वीर सावरकर महाविद्यालयाची कोनशिलाही त्यांच्या हस्ते बसविण्यात आली, तसंच केंद्रीय शिक्षण मंडळाच्या नवीन विस्तारित परिसराचं लोकार्पण त्यांनी केलं. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री मनोहर लाल यांचंही भाषण यावेळी झालं.