राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जात आहेत. त्या उद्या सोमनाथ मंदिरात दर्शन घेतील. तसंच गीर राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊन स्थानिक आदिवासी समुदायाशी संवाद साधणार आहेत. शनिवारी त्या द्वारकेमध्ये द्वारकाधीश मंदिराला भेट देणार असून, त्यानंतर गुजरात विद्यापीठाच्या 71व्या पदवी प्रदान समारंभाला उपस्थित राहाणार आहेत.
Site Admin | October 9, 2025 9:55 AM | Gujarat | President Draupadi Murmu
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर
