प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत पात्र कुटुंबांची निवड करण्यासाठी पालघर जिल्ह्यात आवास प्लस २०२४ सर्वेक्षण सध्या वेगानं सुरू आहे. जिल्ह्यात ४ मे पर्यंत, ११ हजार ४६५ कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झालं, अशी माहिती प्रकल्प संचालकांनी दिली.
ग्रामीण भागातल्या घर नसलेल्या किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. डहाणू तालुका सर्वेक्षणात आघाडीवर आहे. पात्र नागरिक सर्वेक्षण पथकाशी संपर्क करून तसचं आवास प्लस २.० या अॅपवरून स्वयं-सर्वेक्षण करू शकतात.