प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या देशवासियांना शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रजासत्ताक देश म्हणून भारत ७५ वर्षांचा प्रवास पूर्ण करत आहे, असं सांगून राज्यघटना तयार करणाऱ्या सर्वांना त्यांनी अभिवादन केलं. भारताचा हा प्रवास लोकशाही, प्रतिष्ठा आणि एकता या तत्त्वांच्याच आधारावर झालेला आहे, असं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. या निमित्ताने राज्यघटनेच्या मूल्यांची जपणूक करण्याची आणि एक कणखर आणि समृद्ध भारत घडवण्याची प्रेरणा आपल्याला मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.