प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ साठी ३१ जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार

५ ते १८ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ साठी या वर्षीच्या ३१ जुलैपर्यंत इच्छूक आपले अर्ज दाखल करू शकतात. शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, क्रीडा, कला आणि संस्कृती, विज्ञान आणि तंत्रज्ञान यासारख्या श्रेणींमध्ये उत्कृष्टता दाखविणाऱ्या मुलांना हा पुरस्कार दिला जातो. सर्व अर्ज awards.gov.in या अधिकृत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलद्वारे ऑनलाइन सादर करावीत. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हा देशभरातल्या मुलांच्या अपवादात्मक कामगिरीची दखल घेण्यासाठी दरवर्षी राष्ट्रपतींकडून दिला जाणारा एक प्रतिष्ठित राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.