डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारत आणि अमेरिका संबंधांबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेचं प्रधानमंत्र्यांकडून स्वागत

भारत आणि अमेरिका यांच्यात अतिशय सकारात्मक, दूरदृष्टीपूर्ण, व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उभय देशांमधल्या संबंधांबद्दल केलेल्या विधानावर त्यांनी आज समाज माध्यमावर प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांनी अतिशय संवेदनशील आणि सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं. 

 

   भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध विशेष असून त्याबाबत चिंता करण्यासारखं काही नाही असं ट्रम्प यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. नरेंद्र मोदी हे एक श्रेष्ठ प्रधानमंत्री असून ते आपले कायमच चांगले मित्र राहतील, असंही ट्रम्प म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.