डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अर्जेंटिनाच्या यशस्वी दौऱ्यानंतर प्रधानमंत्री ब्राझीलमध्ये पोहोचले, १७व्या ब्रीक्स परिषदेत सहभागी होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अर्जेंटिनाचा यशस्वी दौरा संपवून आज ब्राझीलची राजधानी रिओ दी जानेरो इथं पोहोचले. भारताच्या प्रधानमंत्र्यांनी अर्जेंटिलाना भेट द्यायची ५७ वर्षांतली ही पहिली वेळ आहे. या भेटीची सुरुवात मोदी यांनी अर्जेंटिनाचे राष्ट्रपिता आणि स्वातंत्र्यसैनिक जनरल जोसे डी सॅन मार्टिन यांच्या स्मारकाला आदरांजली वाहून केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्राध्यक्ष जेवियर मिलेई यांच्याशी बैठक घेतली आणि व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण, अंतराळ, आरोग्य आणि औषधनिर्मिती यासह द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर भर दिला. अर्जेंटिनाच्या दौऱ्यानंतर प्रधानमंत्री मोदी ब्राझील इथं १७व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. यादरम्यान ते जागतिक शांतता आणि सुरक्षा, प्रशासन सुधारणा, कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीने वापर, हवामान कृती, जागतिक आरोग्य, आर्थिक बाबी यासह इतर महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करणार आहेत. तसंच अनेक द्विपक्षीय बैठकाही ते घेतील. ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्याशीही प्रधानमंत्री द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा