डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ब्रिक्स परिषद आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्राझिलियामध्ये दाखल

रिओ द जिनेरोमधील दोन दिवसांच्या ब्रिक्स शिखर परिषदेनंतर, ब्राझील दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल ब्राझिलियामध्ये दाखल झाले. ब्राझीलच्या संरक्षणमंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं. ब्राझिलचे अध्यक्ष लुइझ इनासियोलुला दा सिल्वा यांच्यासमवेत ते आज व्यापार, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य आदी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. या भेटीत द्विपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या होतील अशी माहिती ब्राझिलमधल्या भारतीय राजदूतांनी दिली. त्यानंतर आपल्या परदेश दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात मोदी नामीबियाला जाणार आहेत. नामीबियाचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करणे आणि सहकार्याच्या विविध क्षेत्रांचा शोध घेणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा