प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते सुरतमधल्या निर्माणाधीन बुलेट ट्रेन स्थानकाची पाहणी करतील. त्यानंतर ते नर्मदा जिल्ह्यातल्या देवमोगरा मंदिरात दर्शन घेऊन पूजा करतील. देदीपाडा इथं धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री  भाग घेतील. यावेळी ते ९ हजार ७०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील तसंच उपस्थितांना संबोधित करतील.

 

याशिवाय ते विविध अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या सुमारे १ लाख घरांच्या प्रातिनिधिक गृहप्रवेश समारंभात भाग घेतील. आदिवासी भागाची  संपर्क व्यवस्था सुधारण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या सुमारे साडे सातशे किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाची पायभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.