प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आसाम आणि पश्चिम बंगालमधे ७ हजार ७८० कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचा प्रारंभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधे ६ हजार ९५० कोटी रुपये खर्चाच्या, तर पश्चिम बंगालमधे सिंगूर इथं ८३० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांचं भूमीपूजन आणि उद्घाटन केलं. आसामच्या काझीरंगा अभयारण्यात पोहचण्यासाठीच्या उन्नत मार्ग प्रकल्पाचं भूमीपूजन कालियाबोर इथं करताना मोदी यांनी काझीरंगा अभयारण्याचं जागतिक वारशातलं महत्त्व अधोरेखित केलं. आसामसधल्या ३ नवीन अमृत रेल्वेगाड्यांना त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. 

बंगालमधे बालागढ इथं हुगळी नदीवरच्या  पोर्ट गेट यंत्रणेची पायाभरणी त्यांनी केली. या यंत्रणेमुळे पश्चिम बंगालमधे दळणवळणाच्या पर्यावरणस्नेही मार्गाला प्रोत्साहन मिळेल, रोजगारनिर्मिती होईल, तसंच प्रदूषणाला आळा बसेल  असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला…

अंतर्गत वाहतुकीसाठी विजेवर चालणाऱ्या  अत्याधुनिक कॅटामरान  बोटीचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांनी केलं. बंगालमधल्या दोन नवीन रेल्वे मार्गांचं उद्घाटन त्यांनी केलं,तसंच ३ नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ सी व्ही आनंद बोस, केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार, शांतनु ठाकूर, विधानसभेतले विरोधी पक्ष नेते सुवेंदु अधिकारी आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. 

त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी सिंगूर इथं जाहीर सभा घेतली. केंद्रस

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.