डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री टोकियोमध्ये 15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यासाठी आज सकाळी टोकियो इथं दाखल झाले असून अत्यंत  उत्साही वातावरणात त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. टोकियोमध्ये होणाऱ्या 15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत.

 

जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांच्या निमंत्रणावरून ही भेट होत आहे. शिखर परिषदेदरम्यान, दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणार आहेत. तसंच गेल्या 11 वर्षांत वृद्धिंगत होत असलेली धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी पुढे नेण्याच्या दृष्टीनं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

 

जपानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर प्रधानमंत्री मोदी चीन दौऱ्यावर जाणार आहेत; तियानजिन इथं होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ते सहभागी होतील. या महत्त्वपूर्ण दौऱ्यामुळे भारताच्या राष्ट्रीय हिताबरोबरच प्रादेशिक आणि जागतिक शांतता, सुरक्षा तसंच शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी सहकार्य निर्माण होण्यास हातभार लागेल, असं प्रधानमंत्री मोदी यांनी जपानला रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेच्या अनुषंगानं राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इतर नेत्यांना भेटण्यास आपण उत्सुक आहोत, असंही प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे.